15 January 2025 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

परळी'करांची तहान भागवण्यासाठी आता आल्यात ‘वॉटर व्हीलर’; धनंजय मुंडेंचा उपक्रम

Dhananjay Mundey, Minister Pankaja Mundey, NCP, Parali Politics, Beed Politics

परळी : सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी मराठवाड्यात अजून अनेक भागात हवा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी अजूनही अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्यासाठी अजून स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान परळीतील राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

माजी उपमुख्यमंत्री तथा एनसीपीचे गटनेते आमदार अजित पवार आणि ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत एनसीपीच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आज दि.१९ लै रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे वाॅटर व्हिलर वितरण समारंभ झाला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी स्थानिकांना संबोधित केलं.

दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की, ‘परळीच्या भाजपच्या आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातुन हव तेवढं पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला भीषण पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदारी आहेत असा थेट आरोपच यावेळी धनंजय मुंडे यांनी मंचावरून केला.

स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले परंतु शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणी देखील मोठ्या प्रमाणावर पळवले असा आरोप करून स्थानिक नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार तसेच जवाबदार मंत्री म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा प्रश्न देखील यांनी यावेळी उपस्थित केला.

समाजातील प्रत्येक घटकांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी माझे सहकारी सातत्याने आधार देतात याचा आनंद वाटतो असे सांगून वाॅटर व्हिलर वितरणाचा उपक्रम घेण्याची वेळ येउ नये परंतु भीषण पाणी संकटच इतके झाले आहे की सर्वच जलसाठे संपले आहेत. या परिस्थितीत पाणी वाहून आणण्यासाठीचा आपल्या डोक्यावरील भार वाॅटर व्हिलर वितरण करुन कमी करण्याचा प्रयत्न आहे.परळी शहराला खडका बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सातत्याने आपण सरकारकडे पाठपुरावा केला असून हे पाणी आपल्याला लवकरच उपलब्ध होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x