7 January 2025 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS
x

साताऱ्यातही अतिवृष्टीचा फटका | आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू, 15 घरं या दरडीखाली

Rain Update

सातारा, २३ जुलै | मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमधील तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली आहे. त्यावेळी अनेक लोकांना वाचवण्यातही आले. आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 30 ते 32 लोक मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे, महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.

मागील 4 दिवसांपासून साताऱ्यात मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यापूर्वी कधीच असा पाऊस कोसळला नव्हता आणि पूरही आला नव्हता, असं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. आतापर्यंत आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे. एकूण 15 घरे या दरडीखाली दबल्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Heavy rain in Satara impact landslide killed 12 villagers news updates.

हॅशटॅग्स

#Satara(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x