22 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Weather Report | पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Meteorological Department K S Hosalikar

मुंबई, २५ एप्रिल: एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांत पारा चांगलाच तापला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतोय. तसे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

दरम्यान, आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस पडला. यावेळी जोरदार पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

 

News English Summary: On the one hand, with the onset of summer rains, thundershowers and thunderstorms are expected in central India and Maharashtra for the next four days till April 29. The forecast has been made by the Indian Meteorological Department. It is likely to rain with thunderstorms for the next 5 days.

News English Title: Heavy rain is expected in next five days in Maharashtra some part said Indian Meteorological Department K S Hosalikar news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x