राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ | पुण्याला तडाखा | मुंबईतही हायअलर्ट

मुंबई, १५ ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील निमगाव केतकी गावात पूर आल्याने ५५ जण अडकले होते, यातील ४० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं असून अद्याप १५ जण पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. इंदापूरनजीक २ दुचाकीस्वारांना वाचवण्यात यश आल्याचं बारामतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. सोलापूर येथे उजनी धरणातून २ लाख क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही तासात मुंबईत तुफान पाऊस बरसत असल्याने सायन पोलीस स्थानक, किंग्स सर्कल, हिंदमाता आणि परळमधील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पावासाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही पुढील काही तास पुन्हा जोरदार सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रात्री मुंबईत तुफान पाऊस बरसत असल्याने सायन पोलीस स्थानक, किंग्स सर्कल, हिंदमाता आणि परळमधील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.
(Source ANI) pic.twitter.com/gkEdW6rcuc— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 15, 2020
मुंबई आणि जवळच्या परिसरात ढगांची दाटी झाल्याची माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K.S. Hosalikar) यांनी ट्वीट करत दिली आहे. दुसरीकडे आयएमडीने देखील आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज दिवसभर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
Latest updates at 7 am of 15 Oct
Intense clouds off the coast of Mumbai observed through radar. pic.twitter.com/HugPjKys7h— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 15, 2020
News English Summary: Heavy rains lashes parts of Maharashtra and is likely to continue for the next few days until October 15. The India Meteorological Department (IMD) has also issued a red alert for the entire North Konkan area, including Mumbai and Thane. The depression has weakened into a well marked low pressure area over south Central Maharashtra on Wednesday evening. The IMD has also warned a deep depression off the east coast of North-eastern Andhra Pradesh that will move westward while maintaining its power for the next five days.
News English Title: Heavy rainfall triggers water logging in parts of Mumbai IMD has issued red alert News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO