22 December 2024 8:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

आ. रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका

High Court Notice to MLA Rohit Pawar

कर्जत: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर खंडपीठाने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी १४ उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.

दरम्यान त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते. मतदारांमध्ये पैशांचे वाटप करुन रोहित पवार यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदारांमध्ये पैसे वाटल्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी ‘बारामती ऍग्रो लिमिटेड’च्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन मतदारसंघात पाठविले होते. या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्येकी १००० रुपयांची लाच देऊन रोहित पवार यांना मत देण्यास प्रलोभन केले, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे. ‘समाज माध्यमांवर माजी मंत्री राम शिंदे यांची बदनामी करणारे संदेश पाठविण्यात आले. कर्मचाऱ्यांवर प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील लपवून ठेवण्यात आला आहे,’ असाही आरोप आहे.

राम शिंदे यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तसाच आमचाही असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला न्यायालयाकडून आतापर्यत कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाही. त्यामुळे राम शिंदे कोणत्यासंदर्भात न्यायालयात गेले आहे आणि त्यांनी कोणते मुद्दे मांडले आहे यासंदर्भात मला नोटीस हाती आल्यानंतर समजेल. त्यानंतर मी यावर भाष्य करणार असल्याचे देखील आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: High Court Notice to NCP MLA Rohit Pawar.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x