मतदारसंघातील कोरोना रुग्णांचे हाल बघवले नाही | बाळासाहेबांच्या शिवसैनिक आमदाराने ९० लाखाची एफडी मोडली आणि...

हिंगोली, २५ एप्रिल: कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे देशात नवीन रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे. विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शहर आणि ग्रामीण भागातही रुग्णांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. अनेक रुग्णांचे कुटुंबीय मदतीसाठी इतरांकडे हात जोडून मदत मागत आहेत. स्वतःमध्ये माणूस जिवंत असणाऱ्या कोणालाही त्यांचे हाल पाहावणार नाहीत. असाच एक प्रकार हिंगोलीत घडला आहे.
हिंगोलीत सरकारी कागदोपत्री अडथळ्यात रेमडेसिविर इंजेक्शन अडकले होते. ते सहन न झाल्याने आणि वेळ अत्यंत कमी असल्याने अखेर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले. गेल्या १० ते १२ दिवसांपासून कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचं मानून आमदारांनी आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्श निर्माण केल्याचं पाहायला मिळालंय.
सुरुवातीला ९०० रुपये दराने जवळपास पाचशे इंजेक्शन्स आणून आ. संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते. परंतु, नंतर या इंजेक्शन्सचा तुटवटा निर्माण झाला अन् दर वाढले. त्यानंतर १८०० रुपयांनी काही इंजेक्शन्स वाटले. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात, म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. परंतु, बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी सोसायचा म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. त्यातच आ. संतोष बांगर यांच्या कानावर ही बाब गेली. त्यांनीही प्रशासकीय यंत्रणेला विनंती करून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले.
परंतु, यातून काहीच मार्ग निघत नव्हता. यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली. त्यात त्यांना ५ ते ६ लाखांचे नुकसान सोसावे लागणार आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आ. बांगर यांना मिळणार आहे. त्यातही ना नफा, ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्त उपलब्ध करून दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
दरम्यान, याबाबत आ. संतोष बांगर म्हणाले, सध्याचा कोरोनाचा काळ हा अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढे करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.
News English Summary: In Hingoli, the Remadesivir injection was stuck in a government paperwork barrier. Unable to bear it and with very little time, Shiv Sena MLA Santosh Bangar finally broke his own fixed deposit and made Rs 90 lakh available to a private distributor. In the last 10 to 12 days, the havoc in the corona has increased dramatically.
News English Title: Hingoli Shiv Sena MLA Santosh Bangar broke his own fixed deposit to help covid patients in his constituency news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB