23 February 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती
x

भाजपने पवारांना एस्कोर्ट दिला नव्हता | अजित पवारांच्या सुरक्षेसाठी हवालदारही नव्हता

Home minister Anil Deshmukh, Security reduced, Maharashtra government

मुंबई, १० जानेवारी: राज्यातील महाविकासआघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना मोठा दणका दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप नेते आशिष शेलार इतकेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत ठाकरे सरकारकडून मोठी कपात करण्यात आली आहे.

त्यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर राज्य सरकारकडून सुरक्षा व्यवस्था कपात करण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा दाखला दिला.

शरद पवार केंद्रात इतके वर्ष मंत्री होते. राज्यात ते अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. इतके वरिष्ठ नेते असताना त्यांना भाजप सत्तेत असताना एकसुद्धा पायलट आणि एस्कोर्ट नव्हता. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तरीसुद्धा साधा हवालदार सुद्धा सुरक्षेसाठी नव्हता”, अशी प्रतिक्रिया दिली.

 

News English Summary: An explanation has been given by the state government regarding the reduction in security arrangements. State Home Minister Anil Deshmukh gave an explanation in this regard and gave proof of the security arrangements of NCP President Sharad Pawar. Sharad Pawar was a minister at the Center for so many years. He became the Chief Minister of the state many times. With so many senior leaders, they did not have a single pilot and escort when the BJP was in power. Ajit Pawar was the Deputy Chief Minister. However, even a simple constable was not there for security, he said.

News English Title: Home minister Anil Deshmukh explanation over security reduced by Maharashtra government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x