22 December 2024 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मुख्यमंत्री-गृहमंत्री होते फडणवीस | राज्यातील आमदार-खासदारांच्या फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Devendra Fadnavis

मुंबई, ०६ जुलै | राज्यात भारतीय जनता पक्षाच सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भारतीय जनता पक्षाला भोवण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.

मुस्लीम नाव का ठेवले?
दरम्यान, नाना पटोले यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत माझे फोन टॅपिंग प्रकरणी मुस्लीम नाव का ठेवले? त्यावेजी माझेच नाव ठेवायला हवे होते. हे प्रकरण घडवून हिंदू मुस्लीमांमध्ये भांडण लावायचे उद्देश होता का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामागील मुख्य सुत्रधार कोण हे सर्वाना कळायला हवे ही मागणी ही पटोले यांनी केली.

दानवेंचा पीए आणि खा. काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आला:
ते पुढे म्हणाले की, मी काळात खासदार असून त्यावेळी माझे फोन टॅप करण्याचे काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले. माझ्यासोबत जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक आणि खासदार संजय काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आले होते. त्यामुळे सर्व गंभीर असून कोणालाही कोणत्याही व्यक्तीचा गोपनीयता भंग करण्याचा अधिकार नसल्याचे पटोले यांनी सभागृहात सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home Minister Dilip Walse Patil orders high level probe into Nana Patole’s phone tapping allegations news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x