चुकलेल्या API वर कारवाई होईल | राज्यात अनेक कर्तव्यदक्ष API | पोलिसांचं मनोबल वाढवणं महत्वाचं - गृहमंत्री
मुंबई, १८ मार्च: मुंबईतील सध्या मुंबई पोलीस दलातील निलंबित करण्यात आलेले API सचिन वाझे यांच्यामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांना टीका सहन करावी लागत आहे. याच मुंबई पोलिसांना मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा लोकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव देताना सामान्य लोकांनी पाहिलं आहे. आजही ती कटू आठवण आठवली तरी प्रथम नाव येतं मुंबई पोलिसांचं हे सत्य आहे. अगदी सध्याच्या कोरोनाच्या लढ्यातही पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे.
याच मुंबई पोलिसांमधील निलंबित API सचिन वाझे यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जरी शहर पोलिसांची मान खाली गेली असली तरी आजही अनेक API दर्जाचे अधिकारी राज्य आणि शहरातील सामान्य लोकांसाठी जीवाची बाजी लावून कर्त्यव्य निभावत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री देखील पोलिसांचं मनोबल वाढवताना दिसत असून, जे भरकटले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करून त्यांना प्रोत्साहित करावं असं आवाहन करत आहेत.
यानिमित्ताने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक किस्सा सांगितला की, कोरोना काळात जून महिन्यात निसर्ग वादळाचा तडाखा बसणार होता. रस्त्यावर कोणीही उतरलं नव्हतं. त्यावेळी ए पॉसिटीव्ह रक्ताची तातडीने हिंदुजा रुग्णालयात गरज होती. लहान मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी हे रक्त हवे होते. त्यावेळी ताडदेव पोलिस ठाण्याच्या API आकाश जाधव मदतीसाठी धावून गेले आणि ए पॉसिटीव्ह रक्तदान केले. त्यामुळे लहान मुलीवर हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तर कोरोना जास्त प्रादुर्भाव असतानाच्या काळात नातेवाईक देखील मृतदेहाला पाहायला येत नव्हते. शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस संध्या शिलावंत यांनी कोरोना काळात सहा कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. ही बाब कौतुकास्पद आहे याची आठवण त्यांनी करून दिली.
जरा या API कडे लक्ष द्या आणि सकारात्मक राहून आपल्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची मान देशात ताठ राहिला याची काळजी घेऊ;
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सपोनि.मधुरा कोराणे यांनी कचऱ्यात टाकून दिलेल्या अवघ्या १ दिवसाच्या बाळाला दुचाकीवर रुग्णालयात नेऊन जीवदान दिले.कोराणे यांच्या ममत्वाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.@PuneCityPolice @CPPuneCity pic.twitter.com/1ArFVHEnls
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 18, 2021
अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली ५ वर्षांची ममता पाण्याने वेढलेल्या एका झाडावर अडकली होती. @Palghar_Police दलाच्या स.पो.नि.सिद्धवा जायभाये & त्यांच्या सहकाऱ्यांनी ममताचे प्राण वाचविले. ममताचे धाडस व प्रबळ इच्छाशक्ती आणि पालघर पोलिसांची कार्यतत्परता कौतुकास्पद आहे. #SaviourMahaPolice pic.twitter.com/bQmhyZ9YJQ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 6, 2020
Mumbai: Maharashtra Home minister Anil Deshmukh visited Shahu Nagar Police Station in Dharavi today and met the Police personnel there. He also paid tribute to API Amol Kulkarni, who was posted at this police station and died due to #COVID19. pic.twitter.com/Q4vSiZsv61
— ANI (@ANI) May 16, 2020
News English Summary: The Mumbai Police, which is currently well-known across the country, has come under fire for its suspended API Sachin Waze from the Mumbai Police Force. Ordinary people have seen the same Mumbai police giving their lives for the safety of the people when the terrorist attack on Mumbai took place. Even today, even though she remembers the bitter memories, the first name that comes to mind is the truth of Mumbai Police. Even in the current Corona fight, the police have a lion’s share.
News English Title: Home minister Sachin Vaze highlighted good police officer work to encourage them news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH