23 February 2025 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

नारायण राणे पनवती | सिंधुदुर्ग भवन बनवलं आणि कोकणवासीयांना फसवून भूखंड लाटला - खा. विनायक राऊत

MP Narayan Rane

मुंबई, २६ मे | राज्यातील तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. नारायण राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना हाणला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी खुला संवाद साधला. “भारतीय जनता पक्षानं पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलेलं आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रुग्णालयातच RT-PCR चाचणीसाठी जादा पैसे घेतले जातायत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे”, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांनी कोकणात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा देखील विनायक राऊत यांनी यावेळी दिला आहे. सिंधुदुर्ग भवन कसं बनलं, कोकणवासीयांना फसवून भूखंड कसा लाटला हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.

मातोश्री’त शांती यज्ञ घालण्याचा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावरही विनायक राऊत यांनी निशाणा साधला. “नारायण राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत. त्यावर बोलणं त्यांना शोभत नाही”, असं खासदार विनायक राऊत म्हणाले.

 

News English Summary: MP Vinayak Raut has also warned that BJP MP Narayan Rane will expose the corruption in Konkan. We are going to tell the people how Sindhudurg Bhavan was built, how the land was swindled by deceiving the people of Konkan, said Vinayak Raut.

News English Title: How Sindhudurg Bhavan was built how the land was swindled by deceiving the people of Konkan said MP Vinayak Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x