5 November 2024 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

मनसे नेते बाळा नांदगावकर यांना शिवसेनेच्या दादांचं प्रतिउत्तर | म्हणाले...

Agriculture Minister Dada Bhuse, MNS leader Bala Nandgaonkar, CM Uddhav Thackeray

मुंबई, १६ ऑक्टोबर : मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाईन बघता येणार नाही, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.

“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही.थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

याच ट्विटबरोबर बाळा नांदगावकर यांनी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने हातचं पिक गेल्यामुळे हवालदील होऊन रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मनसेबरोबरच काही वृत्तवाहिन्यांनाही टॅग केलं आहे. दरम्यान, बाळा नांदगावकर यांच्या या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे.

दादा भुसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत आहे. तसेच एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्रांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. दरम्यान, परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. सोलापुरात १४ जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे.

उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 

News English Summary: MNS leader Bala Nandgaonkar has also posted a video of the farmers who were in tears due to heavy rains. In this tweet, he has tagged the Chief Minister’s Office, MNS as well as some news channels. Meanwhile, after Bala Nandgaonkar’s statement, now the state’s agriculture minister and senior Shiv Sena leader Dada Bhuse has given an answer.

News English Title: I am visiting all over the state to know the problems of the farmers said Minister Dada Bhuse answer to MNS leader Bala Nandgaonkar News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x