25 November 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक | अन्यथा राजीनामा आणि राजकारणाला रामराम

I will resign, Chhatrapati Udayanraje Bhonsale, Maratha Reservation, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : मराठा राजकारणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं आहे. यावरूनच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं उदयनराजे म्हणाले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन असं त्यांनी सांगितले. तर पोलीस भरतीवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन् काय नाही असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.

“माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर असतो. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते कोणीही असो. मला कोर्टाचा अवमान करण्याची इच्छा नाही. पण कोर्ट म्हणजे काय मला हे कळालंच नाही. कोर्ट म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. निर्णय देताना त्यांनी मनाने विचार केला पाहिजे, त्यांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे,” असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं आहे.

“श्रेय कोणीच घेऊ नये मग ते कोणीही असो. प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होणारच. पण जर तो झाला तर मग त्याला जबाबदार कोण?,” अशी विचारणा उदयनराजेंनी केली आहे. “नेतृत्व कोणीही करावं. पण मुख्य समस्या सोडवली जाणं महत्त्वाचं आहे,” असं ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “जे माझ्या मनाला पटतं ते मी करणार. मी राजकारणी नाही, राजकारण करणं आपल्याला पटत नाही. अन्याय जिथे होत असेल तिथे मी उतरणार”.

 

News English Summary: Everyone should get their due, the court should also give equal rights to all people. If justice is not given, it is natural for an outbreak to take place. MP Udayan Raje said, “I am sincerely saying that if the government does something about Maratha reservation, it will be fine, otherwise it will end politics and resign.” He was speaking in my interview with ABP Majha.

News English Title: I will resign as an MP and get rid of politics says Chhatrapati Udayanraje Bhonsale over Maratha Reservation Marathi Nes LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x