22 January 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

महापालिका निवडणुका | जागावाटपात अडचण आल्यास निकालानंतर एकत्र येऊ - भुजबळ

Municipal election results, Minister Chhagan Bhujbal, MahaVikas Aghadi

नाशिक, १९ डिसेंबर: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे जागावाटप होईपर्यंत आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष आपल्या पक्षाचा संघटनात्मक विस्तार करीत राहील. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांत नाराज आहेत. परंतु त्यांना प्रवेश देतांना वरिष्ठ पातळीवर निर्णयानंतरच त्याचा पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. जागावाटपात अडचणी आल्यास स्वतंत्र निवडणूक लढता येईल. निवडणूक निकालानंतर देखील एकत्र येण्याचा पर्याय असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. If any issue on seats allocation then we could come together even after the municipal election results said minister Chhagan Bhujbal.

महापालिका निवडणूकीत जागावाटपात अडचणी आल्यास काय भूमिका असेल, या संदर्भात ते म्हणाले, जागावाटपात अडचणी आल्यास त्यात देखील पक्षाचे वरिष्ठ नेते परस्परांत चर्चा करीतल एकमत न झाल्यास स्वतंत्र निवडणूका लढता येतील. निवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यावर तिन्ही पक्षांडे एकत्र येण्याचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांतील नाराजांची मोठी संख्या आहे. त्यांना प्रवेश देण्याचे सूत्र असेल. वरिष्ठ त्याविषयी चर्चा करुन निर्णय घेतील.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षामध्ये थेट लढत पाहायला मिळाली. अर्थात तीन पक्षांच्या एकजुटीपुढे भारतीय जनता पक्षाचा टिकाव लागला नाही. सहा पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाच्या पदरी फक्त एक जागा पडली. या निकालांनी भारतीय जनता पक्षाला जबर हादरा बसला असताना आता ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर पालिका निवडणुकांत पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढून नंतर एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले.

 

News English Summary: Until the Mahavikas Aghadi of Shiv Sena, NCP and Congress is allotted seats, every constituent party of the alliance will continue to expand its party organizationally. Various parties, including the Bharatiya Janata Party, are unhappy. But his admission will be decided only after a decision is taken at the senior level. If there are difficulties in allotment of seats, independent elections can be contested. There will be an option to come together even after the election results, said Chhagan Bhujbal, Minister of State for Food and Civil Supplies.

News English Title: If any issue on seats allocation then we could come together even after the municipal election results said minister Chhagan Bhujbal news updates.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x