विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय | मग नेत्यांनाही संसदेत कामकाजासाठी बोलवा - खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद, २९ ऑगस्ट : युजीसी विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात का, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काल निकाल दिला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारला अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परीक्षा रद्द करता येणार नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
युजीसीनं ६ जुलै रोजी परिपत्रक काढून सप्टेंबरपर्यंत विद्यापीठे व इतर उच्च शिक्षण संस्थांमधील पदव्युत्तर व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षासाठी किंवा सेमिस्टर परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. अखेर न्यायालयाने यूसीजीच्या अधिकाऱ्यांना योग्य ठरवलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने जी याचिका केली होती ती फेटाळली आहे. परीक्षेशिवाय पदवी देऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. देशभरातील कुलगुरुंचंही हेच मत होतं. जी कमिटी तयार करण्यात आली होती त्यांनीही हाच रिपोर्ट दिला होता. तरीही केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं. त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
अशातच आता एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, एखाद्याच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेत का? अर्थात सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची फारशी काळजी नाही. नाहीतर कोरोनाची साथ असताना त्यांनी परीक्षा घ्यायचा निर्णय का घेतला असता? जर सरकारला कोरोनाची अजिबात भीती वाटत नसेल तर त्यांनी संसदेचे अधिवेशन बोलवावे. मग भाजपचे किती खासदार उपस्थित राहतात हे पाहू, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
Are exams more important than life! Obviously the government doesn’t care much for students life. Else why would they conduct exams when the pandemic is still on. And if the Corona fear is gone then first call Parliament session and test how many of your BJP MPs attend.!
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) August 25, 2020
News English Summary: Are exams more important than life! Obviously the government doesn’t care much for students life. Else why would they conduct exams when the pandemic is still on. And if the Corona fear is gone then first call Parliament session and test how many of your BJP MPs attend said MIM MP Imtiaz Jaleel.
News English Title: If government can conduct exam then call parliament session also and see how many of your BJP News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON