23 February 2025 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राज्यपालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत

Governor Bhagat Singh Koshayri, Government machinery, MP Sanjay Raut

मुंबई, ११ फेब्रुवारी: राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब अशी की राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचं कळालं आणि त्यांना विमानातून उतरुन राजभवनात परतावं लागलं अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘स्पाइसजेट’ कंपनीच्या खासगी विमानाने उत्तराखंडकडे रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान या सर्व आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काय संबंध आहे. भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं. भारतीय जनता पक्षाकडे खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. अलीकडे राजभवनात राज्यापेक्षा भारतीय जनता पक्षाची कामंच जास्त चालतात अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि त्यानी केलंही नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. दिल्लीत चर्चा व्हावी इतकं प्रकरण गंभीर आहे का याबाबत आपली उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

राज्यापालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचं सरकाने उल्लंघन केलं असतं तर आक्षेप आला असता. अनेक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. तुम्ही जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जाता तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

News English Summary: If the governor wants to use the government machinery for private work, there are some rules in this regard. If the government had violated those rules, there would have been objections. This has happened in many states. The Home Office has some guidelines for using the plane when you go to your state for personal work. The state government has complied with those instructions, ”said Sanjay Raut.

News English Title: If Governor wants to use the government machinery for private work there are some rules said MP Sanjay Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x