22 January 2025 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
x

आम्हाला गृहित धरू नका, वेळ आल्यास तलवारही काढेन | खा. संभाजीराजेंचा इशारा

Draw a sword, Maratha reservation, MP Chhatrapati Sambhaji Raje, Tuljapur

तुळजापूर, ९ ऑक्टोबर : आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. या मोर्चात खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. अशोक चव्हाण यांच्या घरासमोर येत्या 15 तारखेला आंदोलन करणार असल्याची घोषणाही यावेळी संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच आम्ही भीक मागत नाहीत तर आमचा हक्क मागत आहोत असेही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: Don’t take us for granted and don’t let the law take over. MP Sambhaji Raje has made a statement that if the time comes, we will draw a sword for Maratha reservation. The third phase of Maratha Kranti Thok Morcha started from Tuljapur. MP Sambhaji Raje and MP Omraje Nimbalkar had participated in this march.

News English Title: If the time comes I will draw a sword for Maratha reservation says MP Chhatrapati Sambhaji Raje in Tuljapur Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x