3 December 2024 10:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

मराठा आरक्षणाला कोर्टात विरोध करणारे अनुप मरार भाजपचे पदाधिकारी कसे? | उत्तर न देता OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? असे प्रश्न

OBC Reservation

मुंबई, २६ जून | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी फडणवीस यांनी आरोप करताना म्हटलं की, “ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण… तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या… ओबीसी आरक्षणाची जी पिटीशन झाली, ज्या पिटीशनमुळे हा निकाल आला, ही पिटिशन दोन जणांनी दाखल केली होती. पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष…, असं म्हणत काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी आहे”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ओबीसी राजकीय आरक्षांवरून आरोप करणाऱ्या फडणवीसांनी मात्र यापूर्वीची मराठा आरक्षणसंदर्भातील उत्तर दिलेली नाहीत जी थेट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत. कारण याच मुद्द्यावरून भाजपवर थेट आरोप देखील झाले आहेत आणि त्यात इतर पुरावे देखील समोर आले आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली असून, #SaveMeritSaveNation भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा दावा केला होता.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भारतीय जनता पक्षाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला होता. सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली होती. “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा संतप्त सवाल सावंत यांनी केला होता. मात्र ही उत्तर न देता आता देवेंद्र फडणवीसांनी इतरांवर आरोप करून स्वतःवरील आरोपांना आणि पुराव्यांना बगल दिली आहे असंच म्हणावं लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: If you give me power I will get reservation for OBC again otherwise I will retire from politics Says Devendra fadanvis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x