28 January 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमधील मजकुरात परस्पर बदल? | अशोक चव्हाणांमुळे प्रकार उघड

Important file signed, CM Uddhav Thackeray, Mantralaya

मुंबई, २४ जानेवारी: मंत्रालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्परच बदलून फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने राज्य सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या फाईलमध्ये असलेल्या मजकूरात परस्पर बदलण्यात करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या फाईलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरील भागात लाल पेनाने आणखी एक मजकूर लिहण्यात आला अजून त्यात “संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी” असे लिहिण्यात आले होते. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल सध्या वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री मौन बाळगून आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी एखाद्या फाईलवर सही करण्याला खूपच महत्त्व आहे. हा सरकारचा अंतिम निर्णय मानला जातो. त्यानंतर संबंधित निर्णयात सहसा कोणता बदल होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या एका सहीमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी हस्तांतरित केला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईलमधील मजकुराशी अशाप्रकारे छेडछाड होणे, खूपच गंभीर बाब मानली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. एरवी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या प्रतींची तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहला नसल्याचं उघड झालं.

 

News English Summary: A shocking type of ministry has been uncovered. The shocking revelation that the text of an important file signed by Chief Minister Uddhav Thackeray has been tampered with has caused a stir in the state government. Meanwhile, the matter has been taken seriously by the government and a case has been registered at the Marine Drive police station. Meanwhile, Public Works Minister Ashok Chavan has not yet commented on the matter.

News English Title: Important file signed by CM Uddhav Thackeray has been tampered news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x