5 November 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

बारावीच्या निकालात कोकण अव्वल, एकूण निकालात मुलींची यंदाही बाजी

Maharashtra Konkan, division, 12th result 2020

पुणे, १६ जुलै : बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.

दरम्यान, यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला असून निकालात मुलींचीच बाजी दिसून येत आहे. मुलींचा निकाल ९३.८८टक्के लागला तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.

कोकण विभागाने (HSC Result 2020) निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९५.८९ इतका आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के इतका आहे.

कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
MCVC : ९५.०७ टक्के

उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमून्यात शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. तसेच परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

मंडळाच्या या अधिकृत वेबसाइटवर होणार निकाल जाहीर;

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर आकडेवारी देखील उपलब्ध होईल. त्याचबरोबर www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.

ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय़ांव्यतिरिक्त) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे http://verifiation.mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाईटवरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

News English Summary: This year, the result has increased by 4.78 per cent. The result of girls was 93.88 per cent while the result of boys was 88.04 per cent.

News English Title: In Maharashtra Konkan division tops in 12th result 2020 News latest Updates.

हॅशटॅग्स

#HSCBoard(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x