22 February 2025 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज
x

नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत | राष्ट्रवादीचा पक्षविस्तार

In Nagar district, BJP leaders, Join NCP Party, Minister Prajakt Tanpure

नगर, ३ ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगमध्ये अनेक भाजप पदाधिकारी राष्ट्र्वादीत प्रवेश करत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्र्वादीने पक्ष विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर महाराष्ट्रानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्येही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणावर नाराजी असल्याचं समोर आलं आहे. परिणामी पुढील काही दिवसात भाजपातील आमच्या संपर्कात असलेले स्थानिक नेते राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश करतील, असा थेट दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाकडून हे सरकार लवकरच पडेल असं वारंवार सांगितलं जातं आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार यात आम्हाला कुठलीही शंका नाही. ५ वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण होतील आणि यामुळेच त्याच्या पुढली ५ वर्ष देखील आमचंच सरकार असेल, अशी भविष्यवाणी देखील यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: After North Maharashtra, BJP office bearers and activists in Ahmednagar in Western Maharashtra are also dissatisfied. As a result, in the next few days, local leaders in the BJP who are in touch with us will officially join the NCP, a direct claim made by NCP leader and Minister of State for Higher and Technical Education Prajakt Tanpure while interacting with the media.

News English Title: In Nagar district many BJP leaders will join NCP Party soon said Minister for state Prajakt Tanpure News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x