23 January 2025 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

वर्धा: त्या आरोपीला सुद्धा जाळून टाका, न्याय द्या; स्थानिकांची घोषणाबाजी

Wardha professorship female burn

वर्धा: नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्‍कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.

 

 

त्यानंतर एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अवघे हिंगणघाट शहरच निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. गुन्हेगाराला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, कामगार, डॉक्टर्स, वकील, व्यापारी वर्ग व अन्य संघटनांनी मोर्चा काढला.

तत्पूर्वी, जेथे ही घटना घडली त्या नंदोरी चौकातून निघून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे गेला. या मोर्चाला गावातल्या लहान लहान भागातून निघालेले छोटे मोर्चे सामील होताना दिसत होते. येथे मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आरोपीला जाळून टाका, न्याय द्या, सुरक्षा हवी अशा आशयाचे फलक व घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. समुद्रपूरमध्येही अशाच प्रकारचा मोठा मोर्चा काढण्यात आला.

तिला रुग्णालयात दाखल केलं. ही तरुणी ४० टक्के भाजली आहे. तिची वाचा गेली आहे. श्वास घेण्यासही तिला त्रास होतो आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिला नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची दृष्टीही जाण्याची भीती आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

Web Title:  In Vidarbha Wardha Hinganghat shut down professorship fire city local peoples was just down road.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x