22 January 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, ०२ जून |  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं असून संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात असा टोला संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लगावला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचं काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात, असा सवालही त्यांनी केला.

 

News English Summary: It is not right to talk about a person who has lost his balance, they want to be treated, said Sanjay Raut while interacting with the media in Mumbai.

News English Title: It is not right to talk about a person who has lost his balance they want to be treated said Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x