9 January 2025 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
x

ITI Students | आयटीआय विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराच्या संधी - नवाब मलिक

ITI admission 2021 process

मुंबई, २२ ऑगस्ट | कोरोना संकटामुळे रोजीरोटीवर गदा आली असताना राज्य सरकारने मात्र आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे मलिक यांनी सांगितले. मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत आयटीसी हॉटेल सोबत काल (शनिवार) राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुलुंड आयटीआय संस्थेच्याअंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब) मंत्री मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मियावाकी वृक्षारोपणाची पाहणी आणि वृक्षारोपणही करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ. म. जाधव, संस्थेचे उपप्राचार्य संदीप परदेशी, निरीक्षक अनिल सदाफुले यावेळी उपस्थित होते.

आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराची संधी उपलब्ध होणार (ITI students will now get jobs in Five Star hotels) :

ऑन द जॉबची संधी मिळणार:
युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महिन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे मलिक म्हणाले.

विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा:
सामंजस्य करारावर मुलुंड आयटीआयचे प्राचार्य प्रदीप दुर्गे आणि आयटीसी हॉटेल लिमिटेडचे व्यवस्थापक (एचआर) धनंजय कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त होऊन हॉस्पिलीटी सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होणार आहे. ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग पद्धतीअंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयमधील सैद्धांतिक प्रशिक्षणाबरोबरच औद्योगिक आस्थापना, कॉर्पोरेट तथा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची सुविधा प्राप्त होते. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (ITI students will now get jobs in Five Star hotels)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ITI students will now get jobs in Five Star hotels news updates.

हॅशटॅग्स

#ITI(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x