16 January 2025 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

जळगाव महानगरपालिका | महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचा मार्ग खडतर

Jalgaon Municipal Corporation, Mayor election, BJP party, MahaVikas Aghadi

जळगाव, १८ मार्च: आज (१८ मार्च) जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. भारतीय जनता पक्षाची अशी मागणी होती की, महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे. यासाठी भारतीय जनता पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे जळगावात आता महाविकासआघाडीचे वजन आणखी वाढले आहे.

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून बुधवारी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपचे बंडखोर नेते कुलभूषण पाटील उपमहापौर पदासाठी रिंगणात उतरले आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत हे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

News English Summary: Today (March 18) in the face of the election for the post of Mayor of Jalgaon Municipal Corporation, the Bharatiya Janata Party has suffered another major setback. The Bharatiya Janata Party (BJP) had opposed online voting for the elections. The Bharatiya Janata Party demanded that there should be a direct vote for the mayoral post. The Bharatiya Janata Party had rushed to the court for this.

News English Title: Jalgaon Municipal Corporation Mayor election gone difficult for BJP party after court decision news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x