15 January 2025 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

पक्षहित सोडून फडणवीस दिल्लीत वाझे-वाझे करत बसले | इकडे सेनेने जळगावची सत्ता खेचली

Jalgaon Municipal Corporation, Shiv Sena, BJP

जळगाव, १८ मार्च: जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.

जळगाव महापालिका महापौरपदाच्य निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे ते जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने 45 तर भाजपला 30 मते मिळाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

बहुमताचा आकडा पार केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. महापालिकेच्या बाहेर सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला होता. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली होती. यात सुरुवातीला अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले होते. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले.

महत्वाचे म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत ५७ पैकी तब्बल ३० नगरसेवक सेनेत दाखल झाले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावली. कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला.

 

News English Summary: Implementing Sangli pattern in Jalgaon Municipal Corporation, Shiv Sena has finally pulled BJP out of power. Shiv Sena’s mayoral and deputy mayoral candidates have taken a decisive lead. Sena has got a whopping 45 votes. Therefore, saffron has fallen on the Municipal Corporation. An official announcement will be made shortly.

News English Title: Jalgaon Municipal Corporation Shiv Sena has finally pulled BJP out of power news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x