5 November 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

जलयुक्त शिवार योजनेची SIT चौकशी | कॅगच्या अहवालानंतर कॅबिनेटचा निर्णय - उपमुख्यमंत्री

Jalyukta Shivar Yojana, SIT inquiry, CAG Report, Deputy CM Ajit Pawar

पुणे, १६ ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.

अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले. खडसेंबद्दल बोलताना पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.

 

News English Summary: Deputy CM Ajit Pawar responded to the allegations made during the inquiry into the Jalayukta Shivar Yojana. That said, it doesn’t do it on purpose. The CAG report was presented at a two-day session. The CAG report was discussed in the Cabinet and then ordered by the Chief Minister. Suggestions for such a method have passed.

News English Title: Jalyukta Shivar Yojana SIT inquiry after CAG Report said Deputy CM Ajit Pawar News updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x