Jayant Patil Alleges ED CBI IT | भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर CBI, ED आणि IT धाड टाकतात - जयंत पाटील
सांगली, 10 ऑक्टोबर | अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स कारवाई (Jayant Patil Alleges ED CBI IT) करत आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे अधिकारी चालवत नाहीत तर भाजपचे नेते चालवतात, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीच्या कुंडल येथे बोलत होते.
Jayant Patil Alleges ED CBI IT. The CBI, ED and Income Tax are taking action against the BJP leader whose name is mentioned. Therefore, CBI, ED and Income Tax are not run by officials but by BJP leaders said minister Jayant Patil :
सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे विधानपरिषदेचे पुणे पदवीधरचे आमदार आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार घेण्यात आला होता. या कार्यक्रमास मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी भाजप वर टीकास्त्र केले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, “आपल्या देशात दोन माणसं सगळे खाजगीकरण करण्यात व्यस्त आहेत. पण याचा फरक तुम्हाला पडणार आहे, कारण याचा फटका सर्वच क्षेत्रात महागाई वाढणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले. सोयाबीनचा दर11 हजार झाला असता शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर भाजपवाल्यांना ते सहन झालं नाही. त्यामुळे दर पाडला गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. या देशात शेतकऱ्याच्या हातात काही जाऊ लागले तर भाजपला ते सहन होत नाही. भाजपचा हा चेहरा वारंवार दिसून येत आहे. या देशात शेतकऱ्याला चिरडून मारले तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्याचा गळा कापण्याच्या प्रयत्न करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Jayant Patil Alleges ED CBI IT after actions against DCM Ajit Pawar.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार