22 January 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला खोपच्यात घेऊन दम भरला होता, हेच बोलायचं बाकी

Journalist Vijay Chormare, Parambir Singh, CM Uddhav Thackeray

मुंबई, ७ एप्रिल: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सकाळीच एनआयए कार्यालयात दाखल झाले. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. सचिन वाझेंची नियुक्ती आणि इतर विषयांवर परमबीर सिंह यांना प्रश्न केले जाऊ शकतात.

दरम्यान, तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असं मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

तत्पूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट १०० कोटीच्या वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझे अडकल्यानंतर अचानक परमबीर सिंग यांनी स्वतःची कातडी वाचविण्यासाठी अनिल देशमुख यांना मध्ये आणत मूळ तपासात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय. त्यात आज त्यांनी NIA कार्यालयात हजेरी लावून जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आता अजून कोणता आरोप त्यांनी केला आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यालाच अनुसरून पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी ट्विटरवरून परमबीर सिंग यांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरेंनी मला खोपच्यात घेऊन सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी दम भरला होता, हे परमवीर सिंग यांच्याकडून ऐकण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे !

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh arrived at the NIA office this morning. The National Investigation Agency (NIA), which is probing both the Antilia blasts and the suspected death of Mansukh Hiren, is also likely to probe Parambir Singh. Parambir Singh may be questioned on Sachin Waze’s appointment and other issues.

News English Title: Journalist Vijay Chormare slams Parambir Singh over blind allegations news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x