24 November 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

घराणेशाहीचा आरोप कोणी करणार नाही असं काम करून दाखवीन: आ. रोहित पवार

MLA Rohit Pawar, Karjat Jamkhed, Sharad Pawar

संगमनेर: महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.

रोहित पवार म्हणाले की, कर्जत- जामखेड मधील जनता माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय झाला. तसेच तुम्ही ज्या वेळी निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असल्याचा भावनिक प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी आम्हाला कधीही हार मानायची नाही. कितीही मोठं आव्हान समोर असलं तरी झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

राजकारणात किती लोकांना वाटलं पवार साहेब रिटायर होतील. पण ते म्हणाले, नाही, हार मानायची नाही आणि कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं, असं रोहित पवारांनी सांगितलं.

‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.

 

Web Title:  Karjat Jamkhed will become role Model of Development says NCP MLA Rohit Pawar.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x