15 November 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

महिलेच्या लैंगिक शोषणामुळे राजीनामा देणारे आ. जारकिहोली फडणवीसांच्या भेटीला | म्हणाले फडणवीस माझे गॉडफादर

BJP MLA Ramesh Jarkiholi

मुंबई, २५ जून | कर्नाटकातील विवादित आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकिहोली यांनी आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश जारकिहोली म्हणाले की, मला पुन्हा मंत्री बनण्यात रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाने मला जो सन्मान दिला आहे तो काँग्रेसमध्ये मला २० वर्षात कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडती नौका आहे त्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षात परतण्याचा विचारही करत नाही. मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत होतो परंतु वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तुर्तास हा निर्णय घेत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मी आता उघडपणे बोलू शकत नाही, मी खुश नव्हतो म्हणून राजीनामा देण्याचा विचार करत होतो. मी राजकारणातून राजीनामा देईन पण आता नाही. भाजपा आणि आरएसएसनं मला सन्मान दिला. कोणत्याही किंमतीत काँग्रेसमध्ये परत जाणार नाही. भलेही काँग्रेसनं मला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला तरी जाणार नाही. जर राजीनामा दिला तरी भाजपात राहीन, कोणीतरी म्हणतं मी काँग्रेसमध्ये जाणार. पण मी याचा विचारही केला नाही असं रमेश जारकिहोली यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्याचसोबत काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचण अधिक बोलू शकत नसल्याचं देखील ते म्हणाले.

तब्बल ६ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रमेश जारकिहोली एक ताकदीचे मंत्री होते. हे त्या १७ आमदारांपैकी एक होते जे २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपात आले होते. रमेश जारकिहोली हे राज्यातील बड्या राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ते मोठे साखर व्यावसायिक आहे. काही महिन्यांपूर्वी रमेश जारकिहोली यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. रमेश जारकिहोली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची बदनामी झाली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi meet state oppostion leader Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x