राज्य सरकारकडे डॉक्टर-नर्सेसची कमतरता; मदतीसाठी केरळ सरकारला पत्र
मुंबई, २५ मे : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत रविवारी ३ हजार रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३०४१ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५०,२३१ इतकी झाली आहे. यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३,९८८ इतकी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील काही भागात करोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांविषयीची माहिती दररोज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विटरवरून देतात. रविवारी दिवसभरात आकडेवारीत झालेल्या बदलाची माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करुन दिली.
राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली आहे. राज्य सरकारने केरळकडे १५० डॉक्टर आणि परिचारिका पुरवण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केरळ सरकारने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबईत नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या हॉस्पिटलची जबाबदारी केरळचे डॉक्टर आणि परिचारिका सांभाळणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवरील केंद्राची जबाबदारी केरळकडे सोपवण्यात येणार आहे. रेसकोर्सवर ६०० खाटांचे विशेष कोव्हिड हॉस्पिटल तयार होत आहे. तिथे तब्बल १२५ खाटांचा ICU वॉर्ड असणार आहे. केरळहून येणाऱ्या एमडी अथवा एमएस डॉक्टरांना २ लाख, एमबीबीएस डॉक्टरांना ८० हजार आणि परिचारिकांना ३० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
News English Summary: Corona has sought medical help from the Kerala government to handle the situation in the state. The state government has demanded the supply of 150 doctors and nurses to Kerala. A letter has been sent by the medical education department in this regard.
News English Title: Kerala help to Maharashtra govt to handle corona situation News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER