15 November 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

एप्रिलमध्ये १ लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण, त्यापैकी ९८ हजार डॉक्टर अजून गायब

Lakhs of Ayush doctors, got trained, corona patients

मुंबई, २८ जून : राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.

राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या १,५९,१३३ झाली आहे. सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाइन आहेत आणि ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

दरम्यान, कोरोना रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावा म्हणून एप्रिल महिन्यात सुमारे एक लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण, त्यापैकी केवळ दोन टक्के म्हणजे १ हजार ५०० डॉक्टरांनीच प्रत्यक्ष सेवा द्यायला सुरुवात केली आहे. बाकीचे डॉक्टर अद्यापही सेवेत हजर झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ दीड हजार डॉक्टरांना राज्यातील वेगवेगळ्या भागात पोस्टिंग देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य शिक्षण सचिव संजय मुखर्जी यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावा म्हणून सुमारे दीडलाख आयुष डॉक्टरांपैकी एक लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, यातील केवळ दीड हजार डॉक्टरांनीच कोरोना रुग्णांसाठी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. तर ९८ हजार डॉक्टर या सेवेसाठी हजरच झाले नाहीत त्यामुळे त्यांचे करायचे काय? असा प्रश्न सरकारला पडला आहे. संबंधित नियुक्ती करण्याचे काम डायरेक्ट्रेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे आहे, असे महाराष्ट्र आयुषचे संचालक डॉ. कुलदीप कोहली यांनी सांगितले आहे. मुंबईपासून राज्यभरात डॉक्टरांची कमतरता असल्याचे प्रत्येकाला माहित आहे. सरकारने तात्काळ या डॉक्टरांना नोटीस पाठवायला हवी, अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुढे आली आहे.

 

News English Summary: About one lakh AYUSH doctors were trained in April to effectively treat Corona patients. Millions of rupees were spent on this training. However, only two per cent of them, or 1,500 doctors, have started providing direct services.

News English Title: Lakhs of Ayush doctors of Maharashtra got trained but even two percent not seeing corona patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x