पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान | सरकारकडून आढावा
पुणे, १७ ऑक्टोबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार ६४८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यातली ५७ हजार ३५४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना बसला आहे.
पुणे जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बागायती शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. पुणे जिल्ह्यातल्या बागायती पट्यातलं नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. वाहून गेलेले कांदा. सडलेला बटाटा, टोमॅटोचा झालेला लाल चिखल आणि भुईसपाट झालेला ऊस. सुजलाम सुफलाम असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर परिसरातील प्रत्येक शेतात कमी अधिक फरकानं हेच चित्रं दिसत आहे. परतीच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिनीवरच्या पिकं मातीमोल केली आहेत.
अतिवृष्टीमध्ये जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पुणे जिल्ह्यात १५३, साताऱ्यात ११, सांगलीत २८, सोलापूरमध्ये ८२९ जनावरे मृत्युमुखी पडली. कोल्हापूरमध्ये पशुधनाचे नुकसान झाले नाही. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष, सूर्यफूल, मका, केळी, पपई या पिकांचे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील १८ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रफळावरील पिके पाण्याखाली गेली. साताऱ्यात १४२० हेक्टर, सांगलीत ८२७६ हेक्टर, सोलापूरमध्ये ५८५८१ हेक्टर आणि कोल्हापूरमध्ये ३९३ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
News English Summary: The return rains that have been continuing for the last few days in the state have caused havoc. So far 44 people have died in the state. 28 people have died in Western Maharashtra and 16 in Marathwada. Due to heavy rains, the highest loss of agriculture in Marathwada is 4 lakh 99 thousand 648 hectares of agriculture in Marathwada. In Western Maharashtra, 57 thousand 354 hectares of agriculture has been destroyed. The worst hit areas are Sangli, Satara, Pune and Solapur.
News English Title: Large farm damage due to rains so far 44 peoples have died in Maharashtra News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC