16 April 2025 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या | फडणवीसांचं टीकास्त्र

Devendra Fadnavis, Mahavikas Aghadi

मुंबई, १८ फेब्रुवारी: शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या ४० दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासघाडी सरकारवर आज टीका केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुळात जो निर्णय आमच्या सरकारच्या काळात झाला आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद सुद्धा झाली, ती केवळ हे सरकार अंमलात आणत नाही, म्हणून शिक्षकांसारख्या घटकावर आंदोलनाची वेळ येणे आणि त्यांना इतके दिवस बसवून ठेवणे हे दुर्दैवी आहे. नुसत्या अंमलबजावणीला सव्वा वर्ष लागतो? मुंबईच्या बिल्डरांना ५ हजार कोटी रूपयांची सूट आणि शिक्षकांसाठी ३०० कोटी खर्च करायला तयार नाही, हे खेदजनक आहे”, असे फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच, विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहोत, जर हा प्रश्न सोडवला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही. असा इशारा देखील यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला. शिक्षकांच्या या आंदोलनास भारतीय जनता पक्षाचा १०० टक्के पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

 

News English Summary: Teachers’ unions have been agitating in Mumbai for the last 40 days for school grants and other demands. However, the sentiments of the Mahavikasaghadi government have become numb. In the past, if there was an agitation, ministers and officials used to come to meet them. No one comes to see me today. ” Saying this, Leader of Opposition Devendra Fadnavis has criticized the Mahavikasghadi government today.

News English Title: Leader of Opposition Devendra Fadnavis has criticised the Mahavikas Aghadi government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#DevendraFadnavis(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या