23 November 2024 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

मुंडे भगिनी आणि समर्थकांमध्ये फडणवीसांविरोधात खदखद वाढली | पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

Pankaja Munde

मुंबई, ११ जुलै | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भारतीय जनता पक्षात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. बीडमधील १४ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भारतीय जनता पक्षातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते.

मात्र मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश समाज माध्यमातून कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला होता.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांना न मिळालेलं मंत्रीपद, त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेला खुलासा आणि त्यानंतर मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP Leader Pankaja Munde reached at Delhi to meet Nadda news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x