21 April 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

सर्व पक्षीच्या नेत्यांचे राज्य व देशासाठी योगदान; काँग्रेस-राष्ट्रवादी हे काय देशद्रोही नाहीत: संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, BJP

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भारतीय जनता पक्षचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. हे महाराष्ट्र राज्य आमचं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे ही राजधानी ताब्यात राहावी असं कारस्थान सुरु आहे असाही आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.

राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?,” असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असे सांगताना काही लोकांना राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आपण दोन्ही पक्षांना करत असल्याचे राऊत म्हणाले.

आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये असे कालपर्यंत अनेक पक्ष म्हणत होते. आता त्यांच्यासाठी वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस-एनसीपीने योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन देखील खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या