17 April 2025 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

VIDEO: राज्यात मोठा चारा घोटाळा, भाजप-सेना समर्थकांचा सरकारी खजिन्यावर दरोडा: स्टिंग ऑपेरेशन

BJP, Shivsena, Devendra Fadanvis, Udhav Thackeray

मुंबई : राज्याला मागील ३ वर्षांपासून सतत दुष्काळाची झळ बसली आहे. दुष्काळ आणि जलसंकटामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती आणि जनावरं देखील संकटात आली आहेत. तीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर चारा-छावण्या उभ्या केल्या आहेत. मात्र सत्तेचा दुरुपयोग आणि मिळालेल्या नैसर्गिक संधीचा गैरफायदा घेत भाजप आणि शिवसेना समर्थक एनजीओ चारा छावण्यांच्या पडद्याआड सरकारी तिजोरीवर अक्षरशः दरोडे टाकत असल्याचं वृत्त आहे. इंग्रजी वृत्त वाहिनी इंडिया टुडेने संबंधित स्ट्रिंग ऑपरेशन करत राज्यातील चारा घोटाळ्याची पोलखोल केली आहे. या स्ट्रिंग ऑपेरेशनमध्ये हा घोटाळा बिहारमधील चारा घोटाळ्याप्रमाणेच असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्य सरकारने मार्च महिन्यातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजनांच्या घोषणा केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील जो भाग दुष्काळाने प्रभावित झाला आहे, त्याठिकाणी चारा छावण्या उभारून शेतकऱ्यांच्या जनावरांना दिलासा देण्याची योजना असल्याचे म्हटले होते. अखेर दुष्काळाने प्रभावित झालेल्या ११ लाख बाधितांसाठी जवळपास १६३५ पशुधन म्हणजे चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभावित झालेल्यासाठी मदत म्हणून ९ ते १८ किलोग्रॅमसाठी ५० ते १०० दर निश्चित करण्यात आले.

सदर विषयाला अनुसरून शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या उभारण्याचे परवाने भाजप आणि शिवसेनेच्या समर्थक संस्थांना बहाल केले आहेत. तसेच विधानसभेच्या अनुषंगाने त्याचा मार्केटिंग म्हणून देखील वापर केला जातो आहे. विशेष म्हणजे हे भाजप-शिवसेना समर्थकांचे चारा छावण्या चालक स्वतःला एनजीओ असल्याचा दावा करत आम्ही हे कोणत्याही फायद्यासाठी करत नसल्याचं भासवत आहेत. धक्कादायक म्हणजे बीड जिल्यातील काळसंबर ग्राम पंचायतीचे सदस्य आणि शिवसेनेशी संबंधित असलेले गणेश वाघमारे यांनी स्वतःच सरकारी चारा छावण्यात कसे घोटाळे केले जात आहेत, याचे धक्कादायक खुलासे स्ट्रिंग ऑपेरेशनमध्ये केले आहेत. त्यात वाघमारे यांनी खुलासा केला आहे की, सर्व अधिकाऱ्यांना पहिल्यादांच एक रक्कम निश्चित करण्यात आली आहे, प्रत्यक्ष मात्र जनावरांना निश्चित केलेल्या आकडेवारी पेक्षा अत्यंत कमी प्रमाणात चारा पोहोचवला जातो आहे.

पुढे गणेश वाघमारे यांनी आपण कोणताही पुरावा सादर करू शकतो असं म्हटलं आहे. दुष्काळामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी सरकारने निश्चित केलेल्या मदत आकडेवारीनुसार छोट्या लाभार्थींना ९ किलो आणि मोठ्या लाभार्थींना १८ किलो अशी आहे. मात्र मी केवळ ६ किलो आणि १२ किलो इतकीच पुरवत आहे असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यासाठी सरकारी अधिकारी देखील सामील असून प्रत्यक्ष कागद पत्रांवर आकडेवारी मोठ्या प्रमाणावर फुगवून दाखवली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चारा कमी पोहोचवून देखील कागद पत्रांवर ती आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येते आहे. धक्कादायक म्हणजे त्या मोबदल्यात सरकारी कर्मचारी आणि अधिकारी १० ते १५ हजार लाच घेत असून हेच चित्र राज्यभर सुरु आहे असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान या चारा घोटाळा बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रमाणेच आहे असं म्हटलं आहे.

Video : काय आहे ते स्टिंग ऑपरेशन

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या