27 January 2025 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

ते म्हणाले 'आता बॉम्बस्फोट होत नाहीत'; मोदींना पुलवामात काय झालं ते अजून माहित नाही?

Narendra Modi, BJP, Sharad Pawar, NCP, Congress

नगर : नगर : आता बाँबस्फोट होत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत आहे चौकीदार त्यांना कोठुनही शोधून काढील आणि शिक्षा करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये केले. काँग्रेस – एनसीपीच्या काळात दहशतवाद वाढला होता. देशात दररोज कुठे ना कुठे बाँबस्फोट होत होते. त्यात सामान्य लोकांचे बळी पडत होते. असं असलं तरी ३०० किलो आरडीएक्स’ने कारमधून बॉम्बस्फोट घडवून आणल्याने तब्बल ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले हे मोदींना अजून समजलं नाही का, अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

परंतु, आता भारत घरात घुसुन दहशतवाद्यांना मारत आहे आणि जगात भारताची प्रतिमा मजबूत झाल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी जाहीर सभेत सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता आम्हाला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही देखील देश विदेशी चष्म्यातून पाहू लागलात काय? असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

जम्मू-काश्मीर’ला देशापासून वेगळं करण्याची आणि वेगळा पंतप्रधान करण्याची भाषा बोलणार्यांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता असल्याचे ते म्हणाले. तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रविरोधी भूमिका का? असे प्रश्न त्यांनी पवारांना विचारले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे;

  1. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो लोकांना पक्की घरे मिळाली. घरात लाईट आली. शौचालय आली. आणि एलपीजी गॅसही मिळाला
  2. 2014 च्या माझ्या नगर मधील सभेला आजच्या निम्मेच लोक हजर होते. आज काय कारण आहे एव्हढे लोक आलेत? तुमच्या या प्रेमाबद्दल मी आभारी आहे.
  3. राधाकृष्ण विखे पाटील सभेच्या स्थळी कींवा स्टेजवर नाहीत.
  4. देश कोणत्या दिशेने जाणार हे तुम्ही ठरवणार आहात. भ्रष्टाचारी नामदार देश चालवणार की इमानदार चौकीदार देश चालवणार हे तुम्ही यावेळी मतदान करताना ठरवणार आहात.
  5. यावर काँग्रेसच्या भुमिकेचे मला आश्चर्य वाटत नाही. मात्र शरदराव को क्या हुवा है… अरे शरदराव..
  6. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो लोकांना पक्की घरे मिळाली. घरात लाईट आली. शौचालय आली. आणि एलपीजी गॅसही मिळाला.
  7. पंतप्रधान कीसान सन्मान योजनेचा लाभ पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकर्यांना सध्या मिळत आहे. मात्र 23 तारखेनंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे.
  8. कोकणात जाणारे पाणी शेतीला देण्याचा प्रकल्प राबवला जाईल. फक्त पाण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन केलं जाईल. पण त्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार यायला हवे.
  9. जनतेतनेच आता नवीन नारा दिला आहे. काँग्रेस कायमसाठी हटवा. तरच देशातील गरीबी संपेल. काँग्रेस हटवा तरच सबका साथ सबका विकास होईल. काँग्रेस हटवा तरच भ्रष्टाचार संपेल.
  10. तुघलक रोड चुनावी घोटाळा हा काँग्रेसने नवीन घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात मध्य प्रदेश मधून पोती भरुन पैसे तुघलक रोडवरील बंगल्यात आले. – मध्य प्रदेशात आताच त्याचं सरकार आलं आहे. तरीही एव्हढे पैसे आले. काँग्रेसची सवय जातच नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x