15 November 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

शिवसेनेला युतीसाठी दिली ही नवी ऑफर; अन्यथा भाजपची स्वबळाची तयारी?

BJP Maharashtra, Bharatiya Janata Party, Shivsena, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: शिवसेनेशी युती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपला फॉर्म्युला तयार केला असून, यामध्ये निम्म्या-निम्म्या जागांची मागणी तुर्तास अमान्य केली आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला १२० जागा देऊ केल्या असून, स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर शिवसेनेच्या भूमिकेकडे भारतीय जनता पक्षाचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत अडचणीच्या काळात शिवसेनेने साथ दिल्याने आता विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. मात्र, विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाने स्वबळावरच लढवाव्यात, अशी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते. मात्र लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मेगाभरतीने भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते स्वबळावर लढण्याचा आग्रह धरीत आहेत. शिवसेनेने निम्म्या जागांची मागणी केली आहे. मात्र, सध्या १२२ जागी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भारतीय जनता पक्षाला मान्य नाही.

विधानसभा निवडणुकीत १३५ पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला १२० जागांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने स्वत: १५६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरीत १२ जागा मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. आता यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात भाजपला त्यांच्या जागांची अदलाबदल हवी आहे. त्यामुळेच स्वबळावर लढण्याचा आग्रह केला जात आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x