22 December 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा

Maharashtra Bandh, Maratha Reservation, Golmej parishad, Marathi News ABP Maza

कोल्हापूर, २३ सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिषदेची सुरूवात करण्यात आली. भरत पाटील यांनी स्वागत केले, पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, परिषदेत केलेले ठराव मुख्यमंत्री, राज्यपालांसह सर्व राज्यकर्त्यांना पाठवले जाणार आहेत. आम्हाला चर्चेला बोलावू नका, मात्र या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्या. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढाई कायम राहणार आहे.

गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव:

  • मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
  • मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
  • केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
  • महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
  • सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.
  • राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
  • मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
  • मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
  • स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
  • अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
  • राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
  • कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
  • राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.

 

News English Summary: The demand for Maratha reservation in the state has started gaining momentum after the Supreme Court granted a stay. In addition, Maratha leaders have called for a ‘Maharashtra Bandh’ on October 10. This decision was taken at the Maratha Samaj Round Table Conference held in Kolhapur. If the demands are accepted, we will withdraw the Maharashtra Bandh, but if no satisfactory response is received, it has been said that the Maratha community in Maharashtra will take to the streets on October 10.

News English Title: Maharashtra Bandh For Maratha Reservation On 10th October Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x