22 February 2025 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Maharashtra Bandh | भाजप-मनसे बंदमध्ये सामील नसण्याचा अर्थ शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेला त्यांचा पाठिंबा - राऊत

Maharashtra Bandh

मुंबई, 11 ऑक्टोबर | लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे बंद पाळण्यात आला. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (Maharashtra Bandh) या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. महाराष्ट्र बंदमध्ये सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देणे आहे, असे म्हणत राऊतांनी भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला.

Maharashtra Bandh. Shiv Sena MP Sanjay Raut slammed both the parties. Not joining Maharashtra bandh means supporting crushing of farmers, says Sanjay Raut, targeting BJP and MNS :

राज्यात आज सर्व जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला भाजप तसेच मनसेने पाठिंबा दिला नाही. यावर बोलताना राऊत यांनी दोन्ही पक्षांवर घणाघाती टीका केली. “भाजप तसेच मनसे या बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत. याचाच अर्थ त्यांनी शेतकऱ्यांना ज्या प्रकार चिरडून मारलं त्या घटनेला पाठिंबा दिला आहे,” असे राऊत म्हणाले.

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय. मात्र, महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. भाजपचे हे आरोपदेखील राऊत यांनी फेटाळून लावले. “महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा तडाखा बसला आहे. ते सातत्याने होत आहे. मी सरकारतर्फे नाही. मी सरकारचा सदस्य नाही. पण माझ्या माहितीनुसार औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे त्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत होते,” असे राऊत म्हणाले. विरोधकांच्या आरोपांत तथ्य नसल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Bandh MNS and BJP not joining Maharashtra bandh means supporting crushing of farmers.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x