मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपचा सक्रिय पाठिंबा | पक्षीय स्वरूपाने समाजात उभी फूट पडण्याची भीती - सविस्तर वृत्त
मुंबई, १६ मे | मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यामध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
चंद्रकांत पाटील माहिती देताना म्हणाले की, “मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत. या आंदोलनात आमचा झेंडा राहील. पण पक्षाचे नाव राहणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले. तसेच, मराठा आरक्षणासाठी आम्हीही कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहोत. ही समिती मराठा आरक्षणात राज्य सरकार कुठे कमी पडले याची पोलखोल करण्याचे काम करेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याशिवाय, मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
समाजाचे प्रतिनिधी सोडून पक्षातील नेत्यांची समिती?
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील भाजपाच्या समितीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या लढ्यात सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी एकत्र होते आणि ते समाजाचे प्रतिनिधी म्हणून एकत्र होते.
प्रसार माध्यमांकडे भाजपच्या समितीतील नेतेच स्वतःलाच समाजाचे प्रतिनिधी म्हणून मिरवतील;
भाजपने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य भविष्यात स्वतःला मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून पुढे आणतील आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून स्वतःची राजकीय प्रतिमा तयार करण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर येतं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील समाजातील इतर नैतृत्व प्रचंड नाराज होऊन त्याचा फटका अखेर मराठा समाजाच्या एकीला आणि आंदोलनाला बसण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या समितीतील सदस्य केवळ सत्ताधाऱ्यांविरोधात मतप्रदर्शन करून एक राज्य सरकारला ‘मराठा विरोधक’ असल्याचा कांगावा करत बसतील अशी अधिक शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
भाजपचे नेते असूनही महाराष्ट्रातील ‘राजेंना’ भाजपच्या समितीत स्थान नाही;
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात थेट समावेश असणारे छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपच्या समितीत कोणतही स्थान देण्यात आलेले नाही. समाजाच्या लढ्यात थेट आणि रोखठोक भूमिका घेणाऱ्या भाजपातील नेत्यांना या समितीपासून शिस्तबद्ध बाजूला ठेवण्यात आलं आहे. त्यात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी वास्तववादी आणि विषयाला अनुसरून प्रतिक्रिया दिल्याने भाजपमध्ये छुपी नाराजी असल्याचं म्हटलं जातंय. तसेच मागील काही काळापासून मराठा समाजाच्या आरक्षणाला अनुसरून छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अनेकदा भेट मागितली होती. पण त्यांना कधी भेटच दिली गेली नाही आणि यावरून मराठा समाजच्या प्रति भाजपच्या दिल्लीश्वरांच्या पोटात काय शिजतंय याचा राजकीय अंदाज बांधला जाऊ शकतो.
फडणवीस सांगतील तेवढंच बोलणारे नेते समितीत?
भाजपचे स्थापन केलेल्या पक्षीय समितीत छत्रपती संभाजी राजे तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना कोणतही स्थान नसलं तरी फडणसवीस सांगतील तेवढच आणि फडणवीस सांगतील तेव्हा बोलणारे पक्षातील नेते समितीत नेमण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर समाजाच्या मेहनतीपेक्षा फडणवीसांची मेहनतचं अधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न होण्याची अधिक शक्यता आहे. राज्यातील तीनही राजे फडणवीस सांगतील त्याप्रमाणे वागणार किंवा बोलणार नाहीत याची राज्य भाजपाला खात्री आहे आणि परिणामी पक्षीय समितीत प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
समाजाच्या आंदोलनात समाजाच्या झेंड्याचं महत्व घटवून ‘भाजपचा झेंडा’ पुढे होणार;
मराठा समाजाच्या भविष्यातील आंदोलनात भाजपच्या पक्षीय स्वरूपाने मराठा समाजाचा भगवा पडद्याआड जाण्याची शक्यता आणि परिणामी प्रसार माध्यमांवर भाजपचे झेंडे झळकताना दिसतील. त्याआडून मराठा समाजातील इतर संघटनांचे देखील महत्व संपुष्टात आणलं जाईल असं म्हटलं जातंय.
भाजपच्या पक्षीय स्वरूपाने इतर पक्षातील नेते, संघटना दुरावतील आणि लढा कमजोर होईल;
मराठा समाजाच्या भविष्यातील आंदोलनात भाजपचा झेंडा वापरल्याने इतर पक्षातील नेत्यांचं आणि संघटनांचं पाठबळ मिळणार नाही आणि त्यातून लढा कमजोर होईल असं म्हटलं जातंय. त्याचा फटका बसला तरी भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्यांच्या मार्केटिंग हेतू सध्या करून जाईल असं अनेकांना वाटतंय. आरक्षण मिळो अथवा न मिळो पण भाजप म्हणजे मराठा समाजाचे प्रतिनिधी अशी प्रतिमा उभी केली जाईल.
कायदेतज्ज्ञांची समिती नेमणार पण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट टाळणार?
चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्हीही कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहोत. ही समिती मराठा आरक्षणात राज्य सरकार कुठे कमी पडले याची पोलखोल करण्याचे काम करेल असं देखील ते म्हणाले. याचाच अर्थ कायदेतज्ज्ञांना नेमून मराठा समाजाच्या प्रत्यक्ष मदतीपेक्षा आणि त्यांना मोठ्या फीस देण्यामागील उद्देश काय तर राज्य सरकारची पोलखोल? यावरून भाजपचा राजकीय उद्देश स्पष्ट होतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तीनही ‘राजे’ समितीत नाही आणि मराठा लढ्यातील राणेंना देखील लांब ठेवलं;
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात थेट समावेश असणारे छत्रपती संभाजी राजे तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपच्या समितीत कोणतही स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आणि फडणवीस सरकारच्या काळात खासदार नारायण राणे यांचं देखील योगदान राहिलं आहे. मात्र काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये एक अंतर्गत गट त्यांच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण भाजपच्या या समितीत खा. नारायण राणे किंवा नितेश राणे यांना देखील स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनी पक्षांतर्गत देखील किती काळजी घेतली आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. कारण मराठा समाजाच्या लढ्यात प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांचं योगदान काय, हा संशोधनाचा विषय असताना त्यांना इथे विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत लॉबी कशाप्रकारे काम करते त्याचा प्रत्यय येऊ शकतो.
News English Summary: The BJP committee, headed by state president Chandrakant Patil, includes Praveen Darekar, Leader of Opposition in the Legislative Council, Shrikant Bhartiya, state general secretary, Ashish Shelar, Vinayak Mete, leader of Shiv Sangram and Narendra Patil, former president of Annasaheb Patil Mahamandal.
News English Title: Maharashtra BJP appointed internal committee over Maratha Reservation issue news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो