22 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

प. बंगालमधील निकालापर्यंत थांबा असं म्हणणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना आता ४ वर्ष थांबावं लागणार

West Bengal Assembly Election 2021

मुंबई, ०२ मे | पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, निवडणुकांचे जवळपास सर्व कल हाती आल्यावर भाजपच्या पदरात मोठी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूलने २०७ जागांवर आघाडी घेत मोदी, शहा आणि संपूर्ण भाजपाला धक्का दिला आहे. बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.

आता केवळ २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालमधील निकाल समोर आल्यानंतर, महाराष्ट्रातही सत्तांतर होऊ शकते, अशी शक्यता काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वर्तवली होती. परंतु, बंगाल निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं अपयश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

 

News English Summary: The BJP was expected to win a landslide victory in West Bengal. However, with almost all the election trends in place, the BJP is facing a major setback. In the West Bengal elections, Trinamool congress is leading with 207 seats, beating Modi, Shah and the entire BJP. After seizing power in Bengal, the BJP had a plan to establish independence in Maharashtra. However, with the fall in Bengal, there are signs that the BJP’s mission in Maharashtra is faltering.

News English Title: Maharashtra BJP plan after West Bengal Assembly Election 2021 result is disturbed news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x