15 November 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

इंधन दर, महागाई, बेरोजगारी मुद्द्यांवर निवडणुका कठीण | भाजप राज्यात आखतंय फक्त 'जात' युद्ध? - सविस्तर वृत्त

BJP Maharashtra

मुंबई ०८ ऑगस्ट | महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

उद्या म्हणजेच सोमवारी सायंकाळी सात वाजता भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

भारतीय जनता पक्षाच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. तत्पूर्वी, दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रातील २०२४ मधील विधानसभा निवडणुका:
मोदी सरकारने २०१४ मध्ये महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी याविषावरून तत्कालीन युपीए सरकारला लक्ष करताना त्यांची सत्ता तर घालवली होती. मात्र दुसऱ्याबाजूला देशवासियांना महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी याच विषावरून मोठी आश्वासनं दिली होती. मात्र त्यात मोदी सरकारं पूर्णपणे नापास झालं असून त्यामुद्यांवर लोकांमध्ये जाण्यास तोंड देखील उरलेलं नाही. त्यात याच मुद्यावर विरोधक मोदींना आणि भाजपाला घेरणार हे निश्चित आहे. परिणामी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघानिहाय केवळ जातीचं कार्ड म्हणजे मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, धनगर आरक्षण अशा मुद्यावर वातावरण पेटतं ठेवण्याची योजना सध्या दिल्लीत आखली जयेत असं खात्रीलायक वृत्त आहे. आरक्षणसंबधित १०२ घटनादुरुस्ती करताना राज्यांना अधिकार तर दिले पण ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तशीच कायम ठेवणे हा त्याच रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील भाजप खासदार-आमदारांना सामान्य लोकांना महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी अशा गंभीर मुद्यांपासून परावृत्त करण्यासाठी केवळ ‘जात’ या विषयावर केंद्रित राहण्याचे आदेश दिल्लीत दिले जणार आहेत असं वृत्त आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपच्या केंद्रस्थानी:
भविष्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत असल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टीका करताना केंद्रस्थानी ठेवण्याची सूचना देखील भाजप आमदार आणि खासदारांना दिल्लीतील बैठकीत दिली जाणार आहे असं भाजप मधील सूत्रांनी नाव न घेण्याचा अटीवर सांगितलं आहे आणि त्याचे संकेत लवकरच दिसतील असं देखील सूत्रांनी म्हटलंय. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी करिष्मा पहिल्यासारखा चालणार नसल्याने तसेच देशातील सामान्य लोकांशी निगडित महत्वाचे मुद्दे (महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी) मोदी सरकार विरोधात असल्याने निवडणुका कठीण असतील आणि त्यासाठी प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी खेळी खेळली जाणार असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. त्यासाठी राज्यात पवारांना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष केलं जाईल आणि त्यात ‘जात’ हाच विषय केंद्रस्थानी असेल असे संकेत दिले आहेत.

राज ठाकरे भेटीमागील वास्तव:
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमागील वास्तव हे युती नव्हे आत दुसरंच काही असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भाजप विरोधात असतील आणि त्यात तिसरा भिडू देखील सभांमधून भाजप विरोधात बोलल्यास भाजपला राज्यातील लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे हे सभांमधून एखादा मुद्दा शिस्तबद्ध मांडून तो लोकांपर्यंत पोहोचवतात हे भाजपाला माहिती आहे. त्यामुळे सभांमधून राज ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असाव यासाठी भाजपची राज भेट असल्याचं म्हटलं जातंय.

त्यासाठी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मनसेच्या तब्बल १० जाहीर सभांसाठी जशी तत्कालीन विरोधकांनी रसद पुरवली होती तशीच आता भाजप पुरवेल असं म्हटलं जातंय. नाशिक, मुंबई आणि पुण्यात राज ठाकरेंचा करिष्मा चालू शकतो हे भाजपाला माहिती आहे. त्यात भाजपची सत्ता असलेल्या नाशिक, पुणे आणि पिंपरीत महागरपालिकेत भाजप पक्ष नापास झाल्याने तिथे लोकसभा निवडणुकीतही फटका बसले असं भाजपाला वाटतंय. त्यामुळे नाशिक आणि पुण्यात राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या खोट्या आश्वासनांची सभांमधून जाहीर पोलखोल केली आणि भाजपवर तुटून पडले तर ते भाजपसाठी घातक ठरेल असं भाजपाला वाटतंय.

त्यामुळे भाजपच्या थिंकटॅंकने माध्यमांसमोर नियोजनबद्ध युतीच्या फुसकुल्या सोडून मनसे कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवलंय आणि ED चौकशी पासूनचा राज ठाकरेंचा राग शांत करण्यासाठी एक नियोजनबद्ध खेळ खेळला आहे तोही दिल्लीच्या आदेशावर हे देखील खात्रीलायक वृत्त आहे. यातून मनसेला फायदा न होता केवळ फटकाच बसेल, कारण संभ्रमामुळे मनसेचा मतदार तर भाजपकडे जाईलच शिवाय शिवसेनेचा काही मतदारही मनसे पेक्षा भाजपाला मत देईल अशी भाजपाची योजना असल्याचं समोर आलंय. राज ठाकरे जातीवर बोलणार नाहीत, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष करतील अशी भाजपाला अपेक्षा आहे आणि त्यासाठीच भेटीगाठी अचानक कोणत्यातरी बहाण्याने वाढल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra BJP will contest upcoming elections on Caste issue to diver voters from major concerns like inflation fuel price unemployment news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x