22 December 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

...म्हणून मन की बातमध्ये मोदींनी चीनचा उल्लेखही केला नाही - काँग्रेस

Maharashtra Congress, China Border, PMCare Fund

मुंबई, २८ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६ वा एपिसोड होता. यावेळी लडाख येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुरू असणाऱ्या चकमकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी चीनचा उल्लेख न करता इशारा दिला आहे. भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो. आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळेवर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानांनी चीनविरुद्ध एकही शब्द का काढला नाही म्हणून काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’वरून महाराष्ट्र काँग्रेसनं एक ट्विट केलं आहे. ज्यात मोदींनी चीनचा उल्लेख का केला नाही, अशी विचारणा करत त्याचा खुलासाही केला आहे.

“पंतप्रधानांनी त्यांच्या नीरस मन की बात कार्यक्रमात चीनविरुद्ध एकही शब्द का काढला नाही? कारण चिनी कंपन्यांनी पीएम केअर फंडाला मोठी रक्कम दिली आहे. झिओमी १० कोटी, हुआवे ७ कोटी, वन प्लस १ कोटी, ओप्पो १ कोटी, टिकटॉक ३० कोटी,” असं म्हणत कांग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

 

News English Summary: Why didn’t the Prime Minister utter a single word against China in his monotonous talk show? This is because Chinese companies have contributed large sums to the PM Care Fund.

News English Title: Maharashtra Congress Criticized Over China Border Clash News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x