16 April 2025 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

‘युजलेस’ जावडेकर! गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे महाराष्ट्रद्रोहीच - काँग्रेस

Maharashtra congress, Prakash Jawadekar, Vaccination

मुंबई, ९ एप्रिल: राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप केला आहे. राज्यातील अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.

प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता. तसेच राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडाही त्यांनी सांगितला होता. यासोबतच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच योग्य प्रकारे केले जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिले जातात. त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवे. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे.’

यावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेश टोपे म्हणाले होते की, ‘लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.’

आता महाराष्ट्र काँग्रेसने देखील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना खडेबोल सुनावले आहेत. यासंदर्भात आकडेवारी जाहीर करताना महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे की, “केंद्रीय मंत्री ‘युजलेस’ जावडेकर वॅक्सिन वेस्टेज रेटबद्दल खोटी माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचा वॅक्सिन वेस्टेज रेट राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजे ३% आहे…गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच!

 

News English Summary: Union Minister ‘Useless’ Javadekar is defaming Maharashtra by giving false information about vaccine waste rate. Maharashtra’s vaccine waste rate is less than half of the national average of 3%. Javadekar, who is defaming the motherland by humiliating Gujarat, is a traitor to Maharashtra

News English Summary: Maharashtra congress slams union minister Prakash Jawadekar over vaccination politics news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या