22 January 2025 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

घोटाळा २५ हजार कोटींचा मग बँकेचा नफा ३०० कोटींपर्यंत कसा? - अजित पवार

maharashtra cooperative bank scam, Shikhar Bank scam, Ajit Pawar, Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गुन्हा दाखल केला. या सर्वांवर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, ‘ईडी’ने शरद पवारांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत बुधवारी २५ सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटनांनी या बंदचं आवाहन केलं असून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे. सकाळी १० वाजता बारामतीतल्या शारदा प्रांगणात सगळ्यांना एकत्र जमा होण्याचं आवाहन करण्यात आलंय. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी याचा निवडणुकीत सहानुभूतीसाठी वापर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह जवळपास ७० जणांवर ईडीनं गुन्हे दाखल केले आहेत. त्यावर अजित पवार यांनी आपली बाजू मांडली आहे. बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल किंवा अनियमितता झाली असेल तर, बँक अडीचशे ते तीनशे कोटींचा नफा कशी कमावते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x