29 April 2025 8:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या
x

ठाकरे सरकारचा महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय | कामाचे तास कमी करून फक्त 8 तासांची ड्युटी

Maharashtra Police

मुंबई, २४ सप्टेंबर | महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलसाठी आठ तासांच्या शिफ्ट सुरू केल्या. जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर, आठ तासांची शिफ्ट पुरुष पोलीस कॉन्स्टेबलसाठीही केली जाईल,” असे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

ठाकरे सरकारचा महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय, कामाचे तास कमी करून फक्त 8 तासांची ड्युटी – Maharashtra government decided to reduce working hours of women police personnel from 12 hours to 8 hours :

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पोलिस दलात कर्तव्यावरील महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना त्यांच्या कामासोबत कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. बऱ्याच वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरापासून अनेक वेळा या महिला कर्मचाऱ्यांना 12 तासांपेक्षा जास्त तास आपले कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सरकारचे आभार मानले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणं शक्य होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra government decided to reduce working hours of women police personnel from 12 hours to 8 hours.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MaharashtraPolice(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony