18 October 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

...तर राज्यात ८ ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होईल | बैठकीनंतरचा अंदाज

Maharashtra government, lockdown, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३ एप्रिल: राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ”हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले. पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो”, हा आपला अनुभव असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी संपादकांसोबतच्या बैठकीत केलं.

कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण बघता, राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या बैठकीत व्यक्त केलं आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन ८ ते १५ दिवसांचा असू शकेल, असा अंदाज वर्तवला जातोय.

दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी केवळ लॉकडाऊनचा इशारा दिला आणि तिथे मजूरांनी आत्ताच घराकडची वाट धरली आहे. अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या गावची वाट धरली असून, घरी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ मध्य रेल्वेच्या CSMT, LTT, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. LTT टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या २० रेल्वेसेवा चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा या ठिकाणी जातात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.

 

News English Summary: Health Minister Rajesh Tope also said that in view of the growing number of Corona patients and the strain on the health system, there is no alternative but strict lockdown in the state. So a full lockdown is likely to be announced soon. It is estimated that the lockdown will last for 8 to 15 days.

News English Title: Maharashtra government may declared lockdown for one or two weeks news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x