20 April 2025 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

राज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार; पण सरकार धोका उचलणार?

Maharashtra, Schools

मुंबई, २४ मे : देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमणादरम्यान, महाराष्ट्र सरकार १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत. राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील अन्य १५ शहरे आहेत.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिफ्टमध्ये वर्ग चालवणं, शाळेचे तास कमी करणं, सकाळच्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालणं आणि क्रीडा उपक्रम राबवण्याच्या योजनांची माहिती दिली आहे.

काय आहेत पर्याय;

पर्याय १
विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं

पर्याय २
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा दुसरा पर्याय आहे

या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करतं आहे. तसंच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Amid a steady rise in corona virus infections in the country, the Maharashtra government is considering reopening schools from June 15. State School Education Minister Varsha Gaikwad has given such hints while talking to the media.

News English Title: Maharashtra Government Plans Gradual Reopening Of Schools From June 15 News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या